गुहागरमधील कारुळ गाव दत्तक घेण्यास अंत्योदय संस्था तयार
गुहागर तालुक्यातील विसापूर कारूळ येथील आपदग्रस्तांनी सहकार्य केल्यास व सरकारने परवानगी दिल्यास अंत्योदय प्रतिष्ठानच्या माध्यमातून अत्याधुनिक सोयीनीयुक्त स्वप्नातले गाव वसवून देऊ असे आश्वासन आमदार प्रसाद लाड यांनी दिले आहे.अंत्योदय ही संस्था मुंबई येथील असून अनेक गरजूंना मदत करण्याचे काम अनेक वर्षे करीत आहे.याच्या अध्यक्षा सौ.नीता लाड आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील तसेच पश्चिम महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना मदतीचे किटचे वाटपही या संस्थेने केले आहे.
गुहागर तालुक्यातील विसापूर करुळ येथे अतिवृष्टीमुळे अडतीस घरांना तडे जाऊन शंभरहून अधिक जणांना प्रशासनाने अन्य ठिकाणी स्थलांतरीत केले आहे. या गावाची पाहणी काल आमदार प्रसाद लाड यांनी केली त्यावेळी त्यांनी आपदग्रस्तांची संवाद साधला सर्वांनी एकत्र येऊन निर्णय घेतला तर नवीन गाव वसवून देण्याची जबाबदारी संस्था घेईल असेही त्यांनी सांगितले.
www.konkantoday.com