राष्ट्रवादीतर्फे आठवडा बाजार येथे दहीहंडी
राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत आणि जय हो प्रतिष्ठानतर्फे रत्नागिरी शहरात आठवडा बाजार येथे जिल्हास्तरीय दहीहंडी स्पर्धेचे आयोजन करणेत आले आहे. विजेत्यांना ११हजार व चषक देण्यात येणार आहे याशिवाय सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत रत्नागिरी तालुक्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहे असे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते कुमार शेटे यांनी सांगितले. या दहीहंडीच्या ठिकाणी गोविंदाच्या सुरक्षेलाही प्राधान्य देण्यात येणार आहे. विशेष स्थानिक कलाकारांचा करमणुकीचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला आहे. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष निलेश भोसले व अभिजीत गुरव उपस्थित होते.
www.konkantoday.com