
दांडी-मालवण येथील महिलांसाठी घरगुती आप्पती व्यवस्थपनेचे प्रशिक्षण संपन्न
रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा, जिल्हा आपत्ती व्यव्थापन प्राधिकरण व महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने दांडी , मालवण येतील मासेमार महिलांना घरगुती आप्पती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण देण्यात आले.यावेळी आपत्ती व्यवस्थापनेचे प्रशिक्षक श्री. प्रवीण सुलोकर यांनी महिलांना घरामध्ये गॅस सिलेंडर वापरताना काय काळजी घ्यावी तसेच, गॅस ला गळती झाली तर काय करावे,विहिरीमध्ये कोणी पडले तर त्यास कसे बाहेर काढावे, सी . पी. आर इत्यादी विषयी माहिती दिली क्रमाची प्रस्तावना महिला आर्थिक विकास महामंडळाचे सिंधुदुर्ग जिल्हा समन्वयक श्री नितीन काळे यानो केले व या प्रशिक्षणाचा उपयोग महिलांना दैनंदिन कामामध्ये होईल असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला. तसेच महिलांसाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत विविध योजनांची माहिती श्री पी. के. गावडे, व्यवस्थापक , जिल्हा उद्योग केंद्र सिंधुदुर्ग यांनी दिली. सौ . गीता चौकेकर , व्यवस्थापक सिन्धुकन्या (माविम) मालवण यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व व्य्वथास्पनचे बहुमूल्य कार्य केले. या प्रसंगी श्री. रविकिरण तोरसकर , अध्यक्ष , नीलक्रांती विविध कृषी , मस्त्यापर्यटन व पणन सेवा सरकारी संस्था मालवण यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. जिल्हा आप्पती व्यवस्थापन अधिकारी सौ. राजश्री सामंत यांचे या कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. रिलायन्स फाउंडेशचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक राजेश कांबळे यांचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम साहायक गणपत गावडे यांनी केले. कार्यक्रमासाठी दांडी येथील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
www.konkantoday.com