बसस्थानकात डिझेल पुरवणाऱ्यांचेमोठे रॅकेट ,दोन जणांना अटक
चिपळूण येथे मध्यवर्ती बसस्थानक येथे डिझेल पुरवठा करणाऱ्या टँकर चालकाने टँकरमधील सर्व डिझेल न उतरवता डिझेलचा अपहार केला म्हणून पोलिसांनी टँकरचा चालक मारुती कांबळे व टँकरचा मालक तुषार काळभोर राहणार पुणे यांना अटक करण्यात आली आहे.एसटी आगार व्यवस्थापक संदीप पाटील यांच्या जागरूकतेमुळे ही चोरी उघड झाली आहे.पुणे येथील व्यंकटेश ट्रान्सपोर्ट अँड सप्लायर्स या कंपनीकडून चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकात डिझेल पुरवठा करणेत येतो. त्याप्रमाणे एक टँकर डिझेल देण्यासाठी स्थानकात दाखल झाला होता.टँकरच्या चार पैकी तीन कप्प्यातील डिझेल लगेच उतरवले मात्र चौथ्या कप्प्यातील डिझेल उतरवताना ड्रायव्हरच्या हालचाली संशयास्पद वाटल्या.त्यावेळी आगार व्यवस्थापकांनी तपासणी केली असता ही चोरी उघड झाली. यासाठी टँकरमध्ये वेगळे तंत्रज्ञान वापरून डिझेल चोरी केली जात होती. एकूण दोनशे लिटर डिझेलचा १३००० रुपयांचा अपहार झाला.या आदी या कंपनीकडून दोन तीन वेळा डिझेल पुरवठा करण्यात आला होता. येथे व अन्य भागातही या कंपनीमार्फत डिझेल पुरवठा होत होता यामुळे या प्रकरणात मोठे रॅकेट असावे असा अंदाज आहे.
www.konkantoday.com