
ज्येष्ठ अभिनेत्री सोनाली जोशी यांचे निधन
जुन्या काळातील अभिनेत्री सोनाली सुधीर जोशी (७०) यांचे नुकतेच रत्नागिरी येथे निधन झाले. सोनाली या प्रसिद्ध अभिनेते सुधीर जोशी यांच्या पत्नी होत. गुणी अभिनेत्री म्हणून त्यांचाा परिचय होता. लग्नानंतर त्यांनी अभिनयातून व्यवसायातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. काही काळ पुणे येथील सौंदर्य उपचार केंद्रात प्रशिक्षक म्हणुन काम केले. रत्नागिरी येथे राहणार्या अपूर्व गणपुले या त्यांच्या मानस कन्या होत. त्यांच्याकडे गेली दोन वर्षे त्या रत्नागिरीत रहात होत्या. कोणाही आल्या गेल्याचे उत्तम अतिथ्य त्यांनी केले. पतीसाठी राखून ठेवलेला घासही पत्नीच्या सह रंगकर्मीना भरवला, अशा शब्दात अभिनेते संजय मोने यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. www.konkantoday.com