
रत्नागिरी शहरातील खड्डे बुजविण्याची नगर परिषदेची मोहीम सुरू
रत्नागिरी : रत्नागिरी शहरात मुख्य रस्त्याला साळवी स्टॉपपासून खालपर्यंत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून ही आता नगर परिषदेने खड्डे बुजवायची मोहीम हाती घेतली आहे. रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर बसस्टॉपसमोरील बाजूस आज नगर परिषदेने रस्ते बुजवायच्या कामाला सुरूवात केली. खडी टाकून रोलर फिरवून खड्डे बुजविले जात आहेत. रत्नागिरी शहराच्या खड्डयांबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. स्वाभिमान पक्षाने तर या खड्ड्यांवर प्र्रदर्शनही भरवले होते. नगराध्यक्ष बंड्या साळवी यांनी देखील काही दिवसांपूर्वी पाऊस कमी झाल्यानंतर हे खड्डे डांबर व खडीने बुजविले जातील असे जाहीर केले होते. त्याप्रमाणे रस्त्याचे खड्डे भरण्यासाठी दोन रोलर व २५ कामगारांची टीम तयार करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहरातील अन्य भागात असलेले खड्डे देखील बुजविले जाणार आहेत. सध्या तरी खड्डे बुजवायची मोहीम नगरपरिषदेने हाती घेतली आहे.
www.konkantoday.com