जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आवश्यक माहिती आता ध्वनी संदेशामार्फत
रिलायन्स फाउंडेशन माहिती सेवा रत्नागिरी व जिल्हाधिकारी कार्यालय रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकरी बंधू आणि भगिणींना कृषी,पशुसंवर्धन,आरोग्य तसेच आपत्ती व्यव्यस्थापन विभागामार्फत विविध आवश्यक माहिती,योजनांची माहिती,सामाजिक उपक्रमांची माहिती जिल्ह्यातील १५००० शेतकऱ्यांना ध्वनी संदेशामार्फत दिनांक १३ ऑगस्ट २०१९ रोजी सुरु करण्यात आली.या सेवेचा शुभारंभ माननीय श्री.सुनील चव्हाण, जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्या हस्ते झाला.यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी माननीय श्री. अजय सूर्यवंशी यांचे अमूल्य सहकार्य लाभले.याप्रसंगी रिलायन्स फाउंडेशनचे श्री. राजेश कांबळे,विनोद गवाणकर आणि विक्रम जाधव उपस्थित होते.
www.konkantoday.com