मुंबईतून सूत्रे हलवून आमदार उदय सामंत यांनी केली साडेतीनशे लोकांची सुटका
सामाजिक वसा घेतलेल्या लोकप्रतिनिधीला कोणीही मदतीची हाक मारली की तो धावून जातो म्हाडाचे अध्यक्ष आमदार उदय सामंत हे मुंबईत बैठकीत असताना त्यांना रत्नागिरीतील श्रीमती बावडेकर यांचा एक मेसेज आला त्यामध्ये सांगली येथील डिग्रज येथे साडेतीनशे लोक यशवंतराव विद्यालयात अडकले असून त्यांना तेथे मदतीची गरज आहे असा मेसेज होता.
त्यावेळी आमदार सामंत हे मुंबईत मीटिंग घेत होते तरी देखील प्रसंगाचे गांभीर्य ओळखून त्यानी तातडीने हा मेसेज मिळाल्यानंतर आपली यंत्रणा हलवण्यास सुरुवात केली त्यांनी आपले प्रशासकीय अधिकारी चंद्रकांत खडतरे यांना संबंधित विभागांना संपर्क करण्यास सांगितले.आमदार सामंत पूर्वी मंत्री असताना त्यांचे खासगी सचिव म्हणून असलेले गोपीचंद कदम हे सध्या सांगली येथे अतिरिक्त जिल्हाधिकारी म्हणून काम करीत आहेत त्यांना तसेच सांगली येथील पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा यांना देखील आमदार सामंत यांनी संपर्क केला.याशिवाय राज्याचे आपत्ती व्यवस्थापनाचे संचालक श्री यावलकर यांना देखील परिस्थितीची कल्पना दिली.
सामंत यांनी सर्व यंत्रणा तत्परतेने हलविल्यामुळे अडकलेल्या साडेतीनशे लोकांपर्यंत प्रशासनाची मदत पोचली आणि त्यांची तातडीने सुटका झाली.
आपला मतदारसंघ नसला तरी आमदार सामंत हे माणुसकीच्या भावनेतून सांगलीतील अडकलेल्या या लोकांच्या मदतीसाठी धावले.या अडकलेल्या लोकांची सुटका झाल्याने आमदार सामंत हे त्यांच्या दृष्टीने देवदूत ठरले.
www.konkantoday.com