राजापूर आगारातील एस टि चालकाचा पाण्यात बुडून मृत्यू.
साप्ताहिक सुट्टी निमित्ताने राजापूर आगारातील व्यंकट मारुती घुळे व त्यांचे दोन सहकारी गोविंदा दहीफळे,वेंकट शिरसाट आज दुपारी आपल्या पाथर्डी – केळवडे मार्गाजवळ असलेल्या एका छोट्या धरणात पोहण्यासाठी गेले होते.यामध्ये वेंकट घुले पाण्यात बुडाले तर इतर दोन साथीदारांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पाण्यात बुडालेल्या घुळे यांना बाहेर काढून राजापूर ग्रामीण रुग्णालयात आणले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले.
www.konkantoday.com