
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून गैरकायदा जमाव करत घोषणा, पोस्टरबाजी करणाऱ्यांवर गुन्हा
रत्नागिरी : मुंबई – गोवा महामार्गावरील भागीरथी पेट्रोलपंपासमोर शनिवारी दुपारी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून गैरकायदा जमाव करत घोषणा व पोस्टरबाजी केली. याप्रकरणी 5 जणांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डॉ. विद्या नागावकर (रा.कारवांची वाडी, रत्नागिरी ), प्रदीप कचरे (सह्याद्री नगर, रत्नागिरी ), अशोक पवार (रा. पारसनगर, रत्नागिरी ), भारती कांबळे (रा. कापडगाव, रत्नागिरी ), विनोद कांबळे (रा.कारवांची वाडी, रत्नागिरी ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक राहुल पावसकर यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, या पाच जणांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग करून गैरकायदा जमाव गोळा करत घोषणा व पोस्टरबाजी केली. अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत.