भोके रेल्वे ट्रॅकवर युवकाचा मृतदेह सापडला
रत्नागिरी ः कोकण रेल्वेच्या भोके येथील रेल्वे रूळावर एका ४० वर्षीय अज्ञात युवकाचा मृतदेह आढळून आला आहे. हा इसम रेल्वेतून पडून जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे. या परिसरात कोकण रेल्वे कर्मचार्यांकडून पेट्रोलिंग केेले जाते. या पेट्रोलिंग करणार्या ट्रॅकमनला या तरूणाचा मृतदेह आढळून आल्याने त्याने भोकेचे स्टेशनमास्तरना या प्रकाराची माहिती दिली. सदरचा तरूण हा या मार्गावरून जाणार्या रेल्वेच्या दारात उभा असावा व त्याचा तोल जावून खाली पडला असल्याने त्याचा मृत्यू झाला असावा. याबाबत भोक्याचे स्टेशनमास्तर महबुब फणसोपकर यांनी याबाबत ग्रामीण पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली आहे.
www.konkantoday.com