
शास्त्री पुलावरून कोसळलेल्या कंटेनरमधील चालक बसवराज छुरी अद्यापही बेपत्ता
रत्नागिरी ः १० दिवसांपूर्वी संगमेश्वर येथे शास्त्री पुलावरून कंटेनर कोसळला होता. या कंटेनरचा चालक बसवराच छुरी हा या कंटेनरबरोबर खाली नदीत कोसळला होता. त्यानंतर पोलिसांनी व ग्रामस्थांनी त्याचा शोध घेतला होता परंतु अजूनही हा चालक अद्यापही मिळाला नसल्यामुळे तो वाहून गेला असण्याची शक्यता आहे. आर. आर. सावळे ट्रान्स्पोर्ट कंपनीचा हा ट्रक बागलकोट येथून निघाला होता.
www.konkantoday.com