महाराष्ट्रातील बेरोजगारी दूर करण्यासाठी आंध्रप्रदेशच्या धर्तीवर कायदा करावा -उदय सामंत
राज्यातील बेरोजगारी दूर करण्यसाठी आंध्रप्रदेश सरकारने जसा कायदा केला तसा कायदा महाराष्ट्र सरकारने करून स्थानिकांना ८०% नोकऱ्या देणे कायद्याच्या सक्तीने बंधनकारक करावे अशी मागणी मा.मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे म्हाडा अध्यक्ष ना.उदय सामंत यांनी संगितले.
हा कायदा झाल्यास स्थानिक बेरोजगारांना त्यांचा जिल्ह्यात असलेल्या खाजगी कंपन्या आणि खाजगी कारखान्यात काम देणं हे खाजगी मालकांना बंधनकारक राहील.
तसेच शासकीय नोकऱ्यांमध्ये देखील स्थानिकांना प्राधान्य देण्याचा कायदा करावा अशीही विनंती करणार असल्याचे त्यांनी संगितले .
ह्या संदर्भात शिवसेना नेते आणि युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे यांनी विशेष पुढाकार घ्यावा ही विनंती त्यांना करणार असल्याचेही ना.सामंत यांनी संगितले.
www.konkantoday.com
l