मेंगलोर एक्सप्रेस चिपळूणला थांबविल्यास २०० प्रवासी देण्याची शौकत मुकादम यांची हमी
चिपळूण ः मेंगलोरहून येणार्या गाडीला चिपळूण स्थानकात थांबा मिळाला पाहिजे अशी मागणी रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकतभाई मुकादम यांनी कोकण रेल्वे महामंडळाकडे केली आहे. ही गाडी पहाटे ५ वा. चिपळूण रेल्वे स्थानकावरून जाते. या गाडीला चिपळूणमध्ये पुरेसे प्रवासी मिळतील की नाही अशी शंका कोकण रेल्वे प्रशासनाला आहे परंतु ही गाडी चिपळूणमध्ये थांबविल्यास २०० प्रवासी हमखास देण्याचे प्रतिज्ञापत्र आपण देऊ असे आश्वासन मुकादम यांनी रेल्वे प्रशासनाला दिले आहे.
www.konkantoday.com