शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार मिलिंद कीर,सेनेला देणार टक्कर

शिवसेनेने नगराध्यक्षपदाची निवडणूक लादली असून त्याविरोधात राष्ट्रवादी इंदिरा काँग्रेस, मनसे, बहुजन समाज पार्टी, वचित आघाडी, आरपीआय गवई गट व स्वाभिमान पक्ष असे सहा पक्ष नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी एकत्र आले असून त्यांनी शहर विकास आघाडी स्थापन केली आहे या शहर विकास आघाडीचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांचे नाव निश्चित करण्यात आले आहे
त्यानंतर आघाडीच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात आली सहा पक्ष एकत्र येऊन झालेली आघाडी ही वज्रमूठ आहे आम्ही ठोसा हाणणार आणि सेनेच्या उमेदवाराला पराभूत करणार असा विश्वास आघाडीचे उमेदवार मिलींद किर यांनी व्यक्त केला आजच आपण शिवसेना पक्षाच्या सदस्यांचा राजीनामा पक्षप्रमुखांकडे फॅक्सवर पाठवून दिल्याचे त्यांनी सांगितले आपण आघाडीतर्फे नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याचे त्यानी स्पष्ट केले सध्याच्या नगरपरिषदेमधील सत्ताधाऱयांनी नगरपरिषदेला खड्ड्यात घातल्याचा आरोपही त्यांनी केला यावेळी राष्ट्रवादीचे कुमार शेटय़े ,बशीर मुर्तूझा, केतन शेटय़े, आय रे ,राकेश चव्हाण अादीआघाडीचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button