
अस्मी संतोष शिंदे चा सत्कार
रत्नागिरी, दि. 3 : राष्ट्रीय सत्यन सह गुणवत्ता शिष्यवृत्तीमध्ये 89 टक्के गुण प्राप्त करुन सौ. गोदुताई जांभेकर विद्यालयातून तृतीय क्रमांक घेवून घवघवीत यश मिळविणाऱ्या अस्मी संतोष शिंदे हिचा कार्यवाहक सहा. जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी उत्तम वेताळ यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.
यावेळी कार्यालयातील लक्ष्मण गवळी, राहूल काटे, अनिल मोरबाळे, सुनिल कदम, मनोज पालांडे, शिवांजन ठिक, निशिगंधा नलावडे व शिवानी चव्हाण उपस्थित होते.
कु. अस्मी संतोष शिंदे हिची आई सानिका शिंदे या जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्या आस्थापनेवर बहुउद्देशीय कर्मचारी म्हणून काम करतात.00