राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालयाचा युके येथे सुद्धा डंका
जागतिक अभियांत्रिकी डिझाईन या स्पर्धेसाठी रत्नागिरी -देवरूख येथील राजेंद्र माने अभियांत्रिकी महाविद्यालय निवड झालेला संघ युके येथे स्पर्धेसाठी भारताचे प्रतिनिधीत्व करत आहे.तेथे त्यांनी सुयश मिळवले असून पहिल्या फेरीमध्ये टेक्निकल इन्स्पेक्शन, चेसी इन्स्पेक्शन, सेफ्टी इन्स्पेक्शन असे राऊंड पूर्ण केले.त्याचप्रमाणे या संघाचा कर्णधार प्रणीत वाटवे याने मानाचा असा ‘क्रेग डॉसन मोस्ट व्हॅल्युएबल टीम मेंबर’ हा अवॉर्ड जिंकला.त्यामुळे या महाविद्यालयाने युके येथे सुद्धा आपला डंका वाजवला आहे.
www.konkantoday.com