
समृद्धी महामार्गावर एका धावत्या खाजगी लक्झरी बसला आग,प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला
समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा अपघात झाला असून एका धावत्या खाजगी लक्झरी बसला आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. महामार्गावरील मुंबई कॉरिडॉरवर मेहकरजवळ चेनेज २८० वर ही घटना घडली आहे.बसमधील एसीमध्ये शॉर्ट सक्रिट झाल्याने ही आग लागली. या खासगी बसमध्ये ३० प्रवाशी व दोन चालक होते. सुदैवाने चालकाने तात्काळ प्रवाशांना बसमधून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला. सिद्धी ट्रॅव्हल्सची ही बस अमरावतीहून पुण्याकडे जात होती.
www.konkantoday.com