चिपळुणात चोरी सत्र सुरूच
चिपळुणात चोऱ्यांचे सत्र पुन्हा सुरू झाले असून बुधवारी रात्री सती बाजारपेठेतील तीन दुकाने फुटल्याची घटना घडली.सती बाजारपेठेतील मीनानाथ धोंडीराम संदे यांच्या कृष्णाई मेडिकलचे कुलूप तोडून चोरी करण्यात आली .ही घटना मंगळवारी रात्री ९.३० ते सकाळी ९ च्या दरम्यान घडली.या मेडिकलमधील २० हजार रुपये किमतीचा लॅपटॉप ,५ हजार ७०० रुपयांची रोकड व ५७० रुपयांचे बॉडी स्प्रे चोरीला गेले आहेत.तसेच येथील अनिल शिवराम कदम यांचे जनरल स्टोअर्स,राजेंद्र रामदास चव्हाण यांचे सायक रूपकाची दुकानेही चोरट्याने फोडले.
www.konkantoday.com