गळती असलेल्या जिल्ह्यातील आठ धरणांची होणार तपासणी
तिवरे धरण दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील धरणांच्या गळतीचा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यातील सर्व धरणांची तपासणी करण्यात आली असून यामध्ये कोणतेही धरण धोकादायक नसल्याचा अहवाल जलसंपदा विभागाने दिला आहे.परंतु काही प्रमाणात गळती असलेल्या आठ धरणाची धरण सुरक्षित संघटना नाशिक यांच्या मार्फत तपासणी करण्यात येणार असल्याची माहिती कार्यकारी अभियंता जगदीश पाटील यांनी दिली .आठ धरणांमध्ये निवे, कोंडिवली, माेरवणे, तेलेवाडी, खेम, साखरपा, तावडे, टांगर या धरणांचा समावेश आहे.
www.konkantoday.com