देवरूखातील गणेशमूर्ती परदेशी वारीवर देवरूख ः देवरूख शहरातील प्रसिद्ध मुर्तीकार
आप्पा साळकर यांच्या गणेश शाळेतील तयार करण्यात आलेली सुबक व सुंदर गणेशमूर्ती स्वीत्झर्लंडला रवाना झाली. या मूर्तीच्या परदेशी वारीचा योग मुळचे रत्नागिरीत असलेले वैभव अभ्यंकर या कुटुंबियांनी आणला आहे. गेली २२ वर्षे स्वीत्झर्लंडमध्ये व्यावसायानिमित्त वास्तव्यास असलेले अभ्यंकर कुटुंबिय गेली २२ वर्षे प्रावेनफेल या शहरात वास्तव्यास आहेत. या कुटुंबाची गणपतीबाप्पावर मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे परदेशात असूनही ते गणेशोत्सोव मोठ्या उत्साहात साजरा करतात. मात्र गणेशमूर्तीची निवड करताना शाडूमातीपासून बनविलेली गणेशमूर्तीची स्थापना करतात. मूर्तीकार साळसकर यांच्या या आधीही गणेशांच्या मूर्त्या परदेशात अन्य कुटुंबानीदेखील नेल्या आहेत.