आता रेल्वे तिकिटातही उधारी करा ः आयआरटीसीची खास सवलत
रत्नागिरी ः प्रवासासाठी सध्या हातात पैसे नसले तरी उधारीवर तिकिट काढायची सोय आयआरटीसीने केली आहे. आयआरटीसीने प्रवाशांसाठी अभिनव योजना आणली असून १४ दिवसांच्या उधारीवर प्रवाशांना तिकिट बुक करता येणे शक्य आहे. मात्र यासाठी प्रवाशाला ३.५ टक्के सर्व्हिस टॅक्स मोजावा लागणार आहे. भारतीय रेल्वेच्या वेबसाईटवर ही क्रेडीटची सुविधा दिली जाणार आहे. या योजनेंतर्गत प्रवास करण्याच्या पाच दिवस आधी तिकिट बुक करावे लागणार आहे. तिकिट बुक केल्यानंतर १४ दिवसांच्या आत तिकिटाचे पैसे भरावे लागणार आहेत. जर प्रवाशाने तिकिटाची रक्कम भरली नाही तर आयआरटीसी या प्रवाशाच्या विरोधात कायदेशीर कारवाई करून दंड वसुल करण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे. जर प्रवाशाने दुसर्यांदा असाच प्रकार केला तर त्याला या योजनेतून वंचित केले जाणार आहे. यासाठी आयआरटीसीच्या वेबसाईटवर जावून अधिकृत रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे.