
बिबट्याचे कातडे विक्री प्रकरणात चार आरोपी अटकेत
चिपळूणजवळील कामथे घाटात तीन लाख रुपये किंमतीचे बिबट्याचे कातडे विक्रीसाठी आणण्यात येत असताना पोलिसांनी छापा घालून चार आरोपींना अटक केली आहे. १)कमलेश देसाई २)शशिकांत देसाई ३)सुनील सावर टक्कर ४)संजय कुमार गुजर अशी आरोपींची नावे असून त्यांना पंधरा जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.