रायगडात चोरी करून रत्नागिरी जिल्ह्यात आलेला चोरटा पोलिसाच्या ताब्यात
रायगड जिल्ह्यातील महाडमध्ये घरफोडी करून पोलिसांना चकवा देऊन फरारी झालेल्या १चोरट्यांला रत्नागिरी जिल्ह्यात पकडण्यात पोलिसांना यश आले आहे .मात्र एक चोरटा फरार झाला .म्हाडातील घरफोडय़ा प्रकरणातील आरोपी रत्नागिरी जिल्ह्यात येत असल्याची खबर रायगड पोलिसांनी खेड पोलिसांना दिली होती त्याप्रमाणे पाळत ठेऊन पोलिसांनी खेड भरणा नाका ते रिक्षातून उतरताना आरोपींना पकडले मात्र एक आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे.