
मिर्या भागात आलेल्या भरतीमुळे बंधार्याला पुन्हा भगदाड, संरक्षक भिंत कोसळली
मुसळधार पाऊस सुरू असतानाच गुरूवारी आलेल्या भरतीमुळे समुद्रकिनार्यावर लाटांचे थैतान पहायला मिळाले. सुमारे ५ ते ६ उंचीच्या लाटा किनार्यावर येवून आदळत असल्याने किनार्यावरील नागरिक भयभीत झाले आहेत. लाटांच्या तडाख्यामुळे मिर्या बंधार्याला पुन्हा भगदाड पडले असून उपळेकर बाग येथील प्रसाद उपळेकर यांची संरक्षक भिंत लाटांच्या तडाख्यात वाहून गेली आहे. लाटामुळे किनारी भागातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
www.konkantoday.com