गणपतीत येणार्या चाकरमान्यांसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखीन चार स्पेशल गाड्या
रत्नागिरी ः भाविकांच्या सोयीसाठी कोकण रेल्वे मार्गावर आणखी चार गणपती स्पेशल गाड्या सोडण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. मुंबई सेंट्रल ते थीवीम, अहमदाबाद ते सावंतवाडी, अहमदाबाद ते थीवीम तसेच वडोदरा ते सावंतवाडी अशा चार गाड्या कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत.
कोकणात गणेशोत्सवासाठी दाखल होणार्या भाविकांची गर्दी लक्षात घेवून कोकण रेल्वे महामार्गावर या आधीही विशेष गाड्या जाहीर करण्यात आल्या आहेत.