खत कारखान्यावर कृषी विभागाचा छापा
रत्नागिरी एमआयडीसीमधील ऍम्बीशियसफिश मिल या अनधिकृत खत कारखान्यावर कृषी विभागाने धाड टाकून कारवाई करण्यात आली. सदर कारखाना दहा वर्षांपासून एमआयडीसीमध्ये असून त्यामध्ये विनापरवाना खत निर्माण केले जात होते .राजापूर तालुक्यातील कशेळी या ठिकाणी तीनशे बेचाळीस बोगस खतांच्या पिशव्या मिळून आल्या त्याचा शोध घेतला असता हे खत एमआयडीसी कारखान्यांमधून आले असल्याची माहिती मिळाली .या कारखान्यात तयार करण्यात येणारे सुपीका हे खत विनापरवाना होते .कृषी विभागाच्या पथकाने या कारखान्यांवर धाड घालून तीनशे बेचाळीस बोगस खताच्या पिशव्या जप्त केल्या. त्याची अंदाजे किंमत चाळीस लाख रुपये आहे.