माहेरी आलेली विवाहिता बेपत्ता
गुहागर ः आपल्या माहेरी गुहागर तालुक्यातील कुटगिरी येथे लग्नासाठी आलेली विवाहिता बेपत्ता झाल्याची तक्रार येथील पोलीस स्थानकात दाखल करण्यात आली आहे. मूळ मार्गताम्हाणे बुद्रूर सासर असलेल्या अनुश्री अंकुश सावर्डेकर (२४) ही ३ मे रोजी कुटगिरी येथे आपल्या माहेरी मुलांसह एका लग्नासाठी आली होती. १४ मे रोजी दुपारी १२.३० वा. दरम्यान ती बेपत्ता झाली. ती कुठेही न सापडल्याने ती बेपत्ता झाल्याची तक्रार तिचा भाऊ अंकुश अशोक सावर्डेकर याने गुहागर पोलीस स्थानकात दिली.