
मत्स्य विभागाकडून मिरकर वाडा भागात आता अंतिम कारवाई सुरू, अतिक्रमण हटवली आता मलबा हटवण्याचे काम सुरू.
रत्नागिरी शहरातील मिरकर वाडा बंदरात असलेल्या 300 च्या वर अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याची मोहीम काल मत्स्य व बंदर विभागाने सुरू केली होती काल पहाटेपासूनच मोठ्या पोलीस बंदोबस्तात ही मोहीम मोठ्या यंत्रणेसह सुरू करण्यात आली होती या मोहिमे अंतर्गत 300 च्या वर असलेले अनधिकृत बांधकामे काल सायंकाळी उशिरापर्यंत भुईसपाट करण्यात आली कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही घटनास्थळी भेट दिली होती याशिवाय मत्स्य व बंदर खात्याचे वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते काल ही बांधकामे पाडून टाकण्यात आल्यानंतर आज सकाळपासून बोलतो जेसीबी व अन्य यंत्रणेच्या साह्याने पाडण्यात आलेली बांधकामे माती व मलबा हे बाजूला करून भरून टाकण्याचे काम सुरू झाले आहे गेली अनेक वर्षे उभे असलेल्या मत्स्य विभागाच्या जवळजवळ 25 एकर जागेवरील अतिक्रमण हटवण्यास आता प्रशासनाला यश आले आहे.