दोडामार्ग येथे टस्कर हत्तींचा शिरकाव

दोडामार्ग ता.१३:येथील घोटगेवाडी परिसरात एक टस्कर पुन्हा दाखल झाले आहेत.असून कॅनाॅल परिसरात एकाचा त्या हत्तीकडुन पाठलाग करण्यात आला.या घटनेची माहीती मिळताच वनविभागाचे अधिकारी रवाना झाले आहेत.
याबाबत वनविभागाचे अधिकारी सुभाष पुराणिक यांनी माहीती दिली.ते म्हणाले कॅनाॅल परिसरात हे हत्ती दाखल झाले आहेत.याबाबतची माहीती ग्रामस्थांकडुन देण्यात आली आहे.त्यानुसार आमचे कर्मचारी त्या ठीकाणी रवाना झाले आहेत.घटनास्थळी लोकांनी गर्दी केली आहे.
हत्तींना कोणी हुसकवण्यासाठी पुढे जाऊन नये,ते पाणी पिण्यासाठी खाली आले असावेत,त्यांच्याकडून होणारी नुकसान भरपाई शासनाकडून देण्याचे काम चालू आहे.त्यामुळे कोणी आपला जीव धोक्यात घालू नये असे आवाहन वन विभागाकडून करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button