
नगरसेवक मुन्ना चवंडे यांच्या माध्यमातून आरोग्य शिबिर.
रत्नागिरी : सेवा सप्ताहानिमित्त नगरपरिषद शाळा नं. 3 येथे माजी नगरसेवक मुन्ना चवंडे यांच्यावतीने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून शहरातील नागरिकांसाठी आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले.या वेळी माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, साईनाथ नागवेकर, सत्यवती बोरकर, कैलास विलणकर, विलास विलणकर, मोहम्मद सुवर्णदुर्गकर, शिवाजी कारेकर, बबलू विलनकर, पिंट्या कारकर, भाजपा शहराध्यक्ष राजेंद्र फाळके, अभिजीत पेडणेकर, बाबू पेडणेकर, समीर रेडीज, रामनाथ हॉस्पिटलचे डॉ. मोहिते आणि कर्मचारी उपस्थित होते. परिसरातील नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला. या वेळी बोलताना महेंद्र मयेकर म्हणाले, मुन्ना चवंडे हे या प्रभागात सातत्याने नवनवीन उपक्रम राबवत असतात. त्यातील हा आरोग्यविषयक उपक्रम स्तुत्य असून त्याला नागरिकांचा मिळणारा प्रतिसाद अभूतपूर्व आहे.