
रत्नागिरीतील वाहनधारकांना भरता येणार वाहतुक दंड ऑनलाइन पद्धतीने
राज्य शासनाच्या वन स्टेट वन ई चलान या उपक्रमाअंतर्गत वाहतूक दंड ऑनलाइन भरण्यासाठी मोबाइल अॅप विकसित करण्यात आले अाहे.यानुसार संबंधित वाहनधारकाला आता महा ट्रॅफिक अॅपवरून ऑनलाइन दंड भरता येणार आहे.या अॅपवरच वाहनचालकाला आपल्या गाडीवर दंड बसवण्यात आला आहे का याची माहिती जाणून घेता येणार आहे.जिल्ह्यात वाहतूक नियमांची अंमलबजावणी वाहतूक शाखेकडून जोरदार सुरू करण्यात आले आहे .पोलिसांप्रमाणे स्वतः वाहन चालकालाही गाडीबाबतची माहिती महा ट्रॅफिक अॅपवरून घेता येणार आहे.रत्नागिरीतील वाहनधारकांनी या अॅपचा वापर करावा असे आवाहन वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल विभुते यांनी केले आहे.
www.konkantoday.com