Monday, Jan 22nd

Headlines:

सिंधुदुर्ग

कणकवली नगराध्यक्ष पदासाठी सौ. खोत आणि सौ. गायकवाड स्पर्धेत

E-mail Print PDF
कणकवली - येथील नगराध्यक्ष पदासाठी कॉंग्रेसच्या सौ. प्रज्ञा खोत आणि सौ. माधुरी गायकवाड या दोघी स्पर्धेत आहेत. हे पद इतर मागास प्रवर्गातील महिलेसाठी आरक्षित असून दोन्ही महिला राजकारणात नवख्या आहेत. कॉंग्रेस नेते नारायण राणे यांच्या निर्णयानंतरच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निश्‍चित होणार आहे. सौ. खोत या उच्चशिक्षित असल्याने त्यांना संधी मिळणार का याबाबतही सर्वाना उत्सुकता आहे.  या पदाच्या दुसर्‍या दावेदार सौ. गायकवाड या खुल्या प्रवर्गातून निवडून आल्या आहेत; मात्र त्या इतर मागास प्रवर्गातील आहेत.

बांधकाम ठेक्याच्या वाढीव रक्कमेवरुन ठेकेदाराची आत्महत्या

E-mail Print PDF
ashok-mestri1सिंधुदुर्ग - घराच्या बांधकामाच्या ठेक्याची वाढीव रक्कम घरमालक देत नसल्याच्या कारणावरुन मालवण तालुक्यातील हेदूळ येथील अशोक तुकाराम मेस्त्री (४९) या ठेकेदाराने कसाल येथे ज्या घराच्या बांधकामाचा ठेका घेतला, त्याच घरात गळफास लावून आत्महत्या केली. अशोक मेस्त्री यांनी कसाल- वझरेवाडी येथे राहणारे अंकुश शिवराम गावडे यांच्या नवीन घराच्या बांधकामाचा ठेका घेतला होता. या घराचे बहुतांशी काम पूर्ण झाले होते. दरवाजे लावणे शिल्लक होते. अशोक मेस्त्री यांनी चिठ्ठीत ‘आपण केेलेल्या घराच्या बांधकामाचे ठरल्यापेक्षा अधिक काम झाले. त्याची वाढीव रक्कम संबंधित घरमालकाकडे आपण मागत होतो. परंतु ती दिलेली नाही. त्यामुळे आत्महत्या करत आहे,’ असे लिहून ठेवले होते.

आम्ही अस्तित्वाची लढाई जिंकली - प्रमोद जठार

E-mail Print PDF
कणकवली - नगरपंचायत निवडणुकीत आमचा पराभव झालेला नाही, तर आम्ही अस्तित्वाची लढाई जिंकली आहे. कॉंग्रेसने साम-दाम-दंड-भेद वापरून आमचे अस्तित्वच पुसून टाकण्याचा प्रयत्न केला; पण शहरवासीयांच्या पाठबळावर आम्ही आमची ताकद दाखवून दिलीय. मागच्या निवडणुकीत शहर आघाडीचा एकच सदस्य होता. आता आमचे चार सदस्य आहेत. पुढच्या निवडणुकीत सोळा सदस्य होतील आणि सत्ता आमचीच असेल, असा विश्‍वास आमदार प्रमोद जठार यांनी व्यक्त केला. येथील आपल्या संपर्क कार्यालयात श्री.जठार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख वैभव नाईक उपस्थित होते.

कणकवलीत ७१.९५ टक्के मतदान

E-mail Print PDF
kankavli-voting1कणकवली- येथील नगरपंचायतीसाठी आज मतदारांनी उत्स्फूर्तपणे हक्क बजाविला. एकूण सरासरी ७१.९५ टक्के मतदान झाले. मतदान शांततेत झाले. एकूण मतदानात ७६ टक्के पुरुष, तर ६८ टक्के महिलांनी हक्क बजाविला. शहरात चार प्रभागांतील सतरा जागांसाठी वीस मतदान केंद्रांवर मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. त्यामुळे कुठल्याच मतदान केंद्रांवर फारशी गर्दी नव्हती. कडक उन्हाचा तडाखा असला तरी प्रत्येक मतदारासाठी वाहन व्यवस्था असल्याने उच्चांकी मतदान झाले. अनुचित घटना टाळण्यासाठी शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आल्याने मतदान शांततेत झाले.

ट्रकमधून दीड लाखाचे चोरीचे दागिने पळवणार्‍यांना पकडले

E-mail Print PDF
silver1वैभववाडी/कणकवली- फोंडा येथे चोरी करून ट्रकमधून दीड लाखांचे दागिने पळविणार्‍याला वैभववाडी पोलिसांनी आज पाठलाग करून पकडले. करूळ तपासणी नाका येथून या पाठलागाला सुरवात झाली. ही घटना आज सकाळी घडली. कणकवली पोलिसांनी सर्वत्र नाकाबंदीचे आदेश दिले होते. त्यामुळे संशयित ट्रकचालक पांडुरंग खोत याला पोलिसांनी रंगेहाथ अटक केली. त्याला कणकवलीचे पोलिस ताब्यात घेणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक संजय बाबर यांनी दिली. फोंडा एसटी स्थानकालगत मुख्य बाजारपेठेत विजय कसवणकर यांचे ज्वेलरीचे दुकान आहे. त्यांनी काल (ता. ३०) रात्री साडेनऊच्या सुमारास दुकान बंद केले होते. मध्यरात्री अज्ञाताने दुकानावरील लोखंडी छपराचे पत्रे कापून आत प्रवेश केला आणि आतील सुमारे एक लाख ५० हजार रुपये किमतीचे चांदीचे दागिने लांबविले. हा प्रकार श्री. कसवणकर यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांना खबर दिली. त्यानंतर जिल्हाभर नाकाबंदी करण्यात आली होती.

Page 674 of 675