Wednesday, Feb 21st

Headlines:

आयबॉलकडून पहिल्या विंडोज फोन ‘ऍन्डी ४एल पल्स’चे फक्त ४९९९/- रुपयांमध्ये अनावरण हा फक्त फोन नाही तर ही तुमची नवीन पल्स आहे!

E-mail Print PDF
iball-4l
    अत्यंत वेगवान शहरातील आयुष्याशी जुळवून घेणे हे तुमच्यासाठी बागेत चालण्यासारखे असेल पण सायबर स्पीडवेवर पल्स पकडण्यासाठी तुम्हाला जास्त टॉर्क लागतो. हेच तुमच्यासाठी आयबॉलने आणले आहे. आयबॉल विंडोज टॅब्लेट डब्ल्‌यूक्यू३२ आणि डब्ल्‌यूक्यू१४९ च्या यशस्वी अनावरणानंतर ते आपल्‌या विंडोज मालिकेत आणखी एक वाढ आणत आहेत. त्यात विंडोज प्रणालीवर आधारित स्मार्टफोन ‘ऍन्डी ४ एल पल्स’ आहे. हा एक असा फोन आहे, जो तुम्हाला आणि तुमच्याभोवतीच्या आयुष्याला एक पाऊल पुढे नेतो. कारण हा फक्त एक नवीन फोन नाही तर ही तुमची पल्स आहे.
देखणे डिझाइन, उत्तम कॅमेरा आणि अद्ययावत विंडोज फोन ८.१ यंत्रणा तसेच अंतर्गत उत्तम वैशिष्टयांनी युक्त असलेला ऍन्डी ४एल पल्स आता तुमच्यासाठी सर्वोत्तम किमतीत म्हणजे ४९९९/- रुपयांमध्ये उपलब्ध आहे. होम कॉम्प्युटिंगचा आनंद आणि मोबाइलची सोय या दोन्ही गोष्टी यात आहेत.
    याला विंडोज फोन ८.१ ऑपरेटिंग सिस्टिमची यंत्रणा असून ते तुम्हाला सर्वोत्तम देते. त्यात उत्तम कामगिरी, उत्तम वापरकर्ता अनुभव, शक्तिशाली कॅमेरा असून त्यामुळे तो सर्वोत्तम विंडोज फोनपैकी एक ठरला आहे. या देखण्या विंडोज ऍन्डी ४एल पल्समधून उत्तम डिझाइन, वैयक्तिक वापरकर्ता अनुभव आणि त्याची खास वैशिष्टे जसे लाइव्ह टाइल्स-सिंगल स्टेप ऍक्सेस आवडत्या ऍप्सना, वेगवान आणि सुलभ टायपिंग अनुभव, वर्ड फ्लो कीवर्ड आणि पीपल हबसह मिळते.
याशिवाय, ऍन्डी ४ एल पल्समध्ये मायाोसॉफ्टचा उत्पादक सूट ऑफिस, वनड्राइव्ह, एक्सबॉक्स, बिंग सर्च ऍप्स आणि इतर अनेक ऍप्स आहेत, जे या फोनमध्ये आधीच टाकलेले आहेत. आपल्‌या स्मार्टफोनवर वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्य हाताळणार्‍या सर्वांसाठी हा एक उत्तम समतोल आहे. मायाोसॉफ्ट ऑफिस आणि वनड्राइव्हसह वापरकर्ते आपल्या सर्व व्यवसायाच्या गरजा सहजपणे पूर्ण करु शकतात.
   सुपरफास्ट क्वाडकोअर स्नॅपड्रॅगन प्रोसेसरने युक्त आणि १ जीबी रॅम असलेला हा स्मार्टफोन शक्तिशाली प्रोसेसिंग, कार्यक्षम मल्टिटास्किंग आणि समृद्ध ग्राफिक्स आणि मीडिया क्षमतांसाठी डिझाइन केलेला असून सोबत उत्तम बॅटरी आयुष्यही आहे. यात एक ४ इंची डिस्प्ले असून ऍन्डी४एल पल्स १५०० एमएएच बॅटरीने युक्त आहे. तो एक उत्तम वापरकर्ता अनुभव देतो.
याशिवाय, या खास स्मार्टफोनमध्ये एक ५ मेगापिक्सेल ऑटो फोकस रेअर कॅमेरा आणि फ्रंट फेसिंग कॅमेरा व्हिडिओ चॅटिंगसाठी आहे. एलईडी फ्लॅश व बीएसआय सेन्सरमधून खरे रंग आणि प्रकाशात क्षण कैद करता येतात. त्यातील वाढील बीएसआय कॅमेरा सेन्सर तंत्रज्ञान वापरकर्त्यांना उजळ आणि स्पष्ट चित्रे जास्त व कमी प्रकाशाच्या वातावरणातही काढता येतात. अंतिमतः हे साधन वापरकर्त्यांना साठवणूकीच्या क्षमतेची काळजी करु देत नाही, कारण ही क्षमता ६४ जीबीपर्यंत विस्तारित करता येते.
अर्थात, थोडक्यात सांगायचे तर हा फक्त एक फोन नाही तर ही तुमची नवीन पल्स आहे.
    आयबॉल विषयीः टीम, उत्साह, नाविन्यपूर्णता...आयबॉलचा ब्रँड या तीन आधारस्तंभांवरच उभा आहे, ज्यामुळे याला आपली कंपनी तसेच निगडित भागिदारांकरिता यश प्राप्त करण्यात मदत मिळाली आहे. एका प्रोडक्टसह २००१ मध्ये आरंभ केलेल्या या कंपनीच्या २६ प्रोडक्ट विभागांमध्ये ३०० पेक्षा जास्त उत्पादनांची भव्य रेंज आज उपलब्ध आहे. हिने भारतात पहिल्यांदा नवीन तंत्रज्ञानासह ६० पेक्षा जास्त उत्पादने दाखल केली आहेत.
    आयबॉलने आतापर्यंत ४५ मिलियनपेक्षा जास्त उत्पादनांची विक्री केली आहे. ही कंपनी आपल्या २५ शाखा कार्यालयांसह संपूर्ण देशामध्ये उपस्थित आहे आणि हिची उत्पादने ४०० पेक्षा जास्त शहरे व नगरांमध्ये उपलब्ध आहेत. संपूर्ण भारतभरामध्ये विस्तारलेल्या हिच्या मालकीच्या जवळ-जवळ १५० पेक्षा जास्त सेवा केंद्रांमध्ये हिच्या उत्पादनांशी संबंधित देखभालीची सेवा केली जाते.
कंपनीने आपल्या क्षमतेचा विस्तार करत आपल्या मोबाईल फोन्स, टॅबलेट पीसीज व ऑडिओ वर्गवार्‍यांकरिता बॉलीवूड अभिनेत्री करीना कपूरला ब्रँड ऍम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे. कॉर्पोरेट विश्‍वामध्ये आयबॉलला चांगल्याप्रकारे स्विकारले जाते. तसेच देशभरामध्ये हे जलदतेने एक कौटुंबिक नाव बनत आहे.
मीडिया विषयक अधिक माहितीसाठी संपर्क साधाः अंकिता मेहता,
सायनॅप्स पीआर,९८२०९६२०२७
This e-mail address is being protected from spambots. You need JavaScript enabled to view it