युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेचे चिपळूण तालुकाप्रमुख उमेश खताते यांची केली सांगली जिल्हा युवासेना विस्तारकपदी नियुक्ती


शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवासेनेचे चिपळूण तालुकाप्रमुख उमेश खताते यांची सांगली जिल्हा युवासेना विस्तारकपदी
नियुक्ती केली आहे. खताते यांनी युवासेना
तालुकाप्रमुखपदाचीजबाबदारी स्वीकारल्यापासून तालुक्यात युवासेनेची ताकद वाढवण्यासाठी अपार कष्ट घेतले. त्यामुळे तालुक्यात युवकांची मज़बूत फळी उभी राहिली आहे. त्यामुळेच खताते यांच्या या संघटन कौशल्याची दखल खुद्द युवासेनाप्रमुख ठाकरे यांनी घेतली आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या मार्गदर्शनानुसार सांगली जिल्हा युवासेना विस्तारकपदी नियुक्ती केली आहे. युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांनी शुक्रवारी शिवसेनेच्या मुखपत्रातून खताते यांच्या नावाची घोषणा केली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button