गणेशोत्सवासाठी रत्नागिरी जिल्ह्यात पोलिस बंदोबस्त वाढवला

रत्नागिरी : कोकणातील महत्वाचा सण असणाऱ्या गणेश उत्सवाला बुधवार दि. 31 ऑगस्टपासून प्रारंभ होणार आहे. रत्नागिरी जिल्हा पोलिस विभागाकडून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. या बंदोबस्तासाठी 1 अपर पोलिस अधीक्षक, 4 उपविभागीय पोलिस अधिकारी, 13 पोलिस निरीक्षक, 23 सहायक पोलिस निरीक्षक, 35 पोलिस उपनिरीक्षक, 350 पोलिस अंमलदार, 2 दंगा काबू पथक, 1 जलद प्रतिसाद पथक तैनात करण्यात येणार आहे. तसेच बाहेरुनही बंदोबस्त मागवण्यात आला असून, यात 10 परिविक्षाधीन पोलिस उपनिरीक्षक, 75 नवप्रविष्ठ अंमलदार आणि 2 राज्य राखीव पोलिस दलाच्या तुकड्याही तैनात करण्यात येणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button