
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ३० हून अधिक मंदिरांमधील घंटा चोरी प्रकरणातील आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
जेसीआय खेड च्या वतीने रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील ३० हून अधिक मंदिरांमधील घंटा चोरी प्रकरणातील आरोपींना जेरबंद करणाऱ्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कारवाईत पीएसआय रोहिदास केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल अजय कडू, वैभव ओहळ, विजेंद्र सातार्डेकर, कृष्णा दराडे तसेच शिरीष साळुंखे यांचे विशेष योगदान राहिले. शिरगाव, कुळवंडी, ऐनवरे, कशेडी, घोगरे, किंजळे, दहिवली आदी गावांतील मंदिरांमध्ये झालेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती व अस्वस्थता दूर करण्याचे मोलाचे कार्य पोलिसांनी केले आहे.पोलीस प्रशासनाने तत्परतेने तपास करत आरोपींना अटक करून मंदिरांचा व भाविकांचा विश्वास पुन्हा दृढ केला. व त्यांच्या या धाडसी व कर्तव्यदक्ष कामगिरीबद्दल जेसीआय खेडतर्फे त्यांचे आभार मानून पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. अध्यक्ष अमित नामुष्टे यांनी पोलिसांच्या कार्याचे कौतुक करत समाजात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन देखील यावेळी केले.अध्यक्ष अमित नामुस्टे , माजी अध्यक्ष अमर दळवी, सदस्य देव लढ्ढा, जय पदमणी , साहिल खेडेकर आदी सभासद उपस्थित होते.




