
रत्नागिरी शहरात विविध मतदान केंद्रावर मतदानाला सुरुवात


आधी लगीन कोंढाण्याचं या उक्तीप्रमाणे रत्नागिरीत लग्नाआधी मतदानाचा हक्क बजावला. जीवन प्राधिकरण मतदान केंद्रावर राहुल शिवलकर तर देसाई हायस्कूल मतदान केंद्रावर समृद्धी सुर्वे हिने मतदानाचा हक्क बजावला.

लोकशाही प्रक्रियेतील सर्वात महत्त्वाचा हक्क म्हणजे मतदान. आपला लोकप्रतिनिधी निवडण्यासाठी प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावणे अनिवार्य आहे. याच कर्तव्यनिष्ठेची आणि जागरूकतेची प्रचिती आज रत्नागिरीमध्ये रत्नागिरी नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या मतदानादरम्यान पाहायला मिळाली.

सकाळपासूनच शहरातील मतदान जागृत मतदाराने मतदानाचा हक्क बजावण्यासाठी रांगा लावल्या आहेत असे असले तरी मतदानाचे गती संथ आहे. अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण, महिला आपला हक्क बजावत आहेत . दरम्याने रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनूज जिंदल यांनी महिला विद्यालय मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली




