
’दडपशाही-भ्रष्टाचार वाढलाय’.. परिवर्तन घडवा, आ. भास्कर जाधव यांचे आवाहन
रत्नागिरी शहरातील खड्डे, पाणी-स्वच्छतेची समस्या, अस्ताव्यस्त वाहतूक यासह तरुणांचा रोजगाराचा अश्न व महिलांची सुरक्षितता यांसारख्या गंभीर प्रश्नांना उत्तर देण्याऐवजी सत्ताधारी केवळ मोकळ घोषणाच करतात. प्रत्येक नागरिकांकडून पाणीपट्टी, घरपट्टी, शिक्षण कर, वीजबिल अगदी झाड लावले तरी कर घेतला जातो, मग त्या बदल्यात सुविधा कुठे आहेत? जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत विकासाऐवजी दडपशाही, भ्रष्टाचार व पैशांचा दुरुपयोग अशा प्रकारांची भर पडली आहे. जनतेची मतं विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे. त्यामुळे आता बदल घडवण्याची वेळ आल्याचे शिवसेना उबाठा पक्षाचे नेते, आमदार भास्कर जाधव यांनी म्हटले आहे.
आमदार भास्कर जाधव यांनी रत्नागिरी नगर परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सावंत माने यांना जनतेने पाठिंबा देण्याचे जोरदार आवाहन केले. शिवानी सावंत-माने यांचे समर्थन करताना जाधव यांनी रत्नागिरीच्या स्थानिक अस्मितेचा मुद्दा ठळकपणे मांडला. तसेच्चे शहराला भेडसावणार्या मूलभूत समस्यांवरून सत्ताधार्यांवर टीकास्त्र सोडले. नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार शिवानी सावंत-माने यांना जाधवांनी पाठिंबा देण्याचे आवाहन केले. शहराला बाहेरून आलेल्या नियंत्रणावर नाचवले जाणार नाही. स्वतःच्या मातीतून उभे राहिलेले नेतृत्व शहर घडवते, असे ते म्हणाले. शेवटी उपस्थित नागरिकांचे आभार मानत २ डिसेंबर रोजी मशाल, तुतारी, हत्ती व हात या निशाणांवर मतदान करून महाविकास आघाडीला विजय मिळवून देण्याचे आवाहन करण्यात आले. या सभेला शिवसेना उबाठाचे उपनेते तथा माजी आमदार बाळ माने, माजी उपनगराध्यक्ष राजेश सावंत, विधानसभा क्षेत्र संघटक प्रमोद शेरे, तालुकाप्रमुख शेखर घोसाळे, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार शिवानी सावंत-माने, राष्ट्रवादीचे नीलेश भोसले, बसपाचे प्रशांत पवार यांसह नगरसेवकपदाचे उमेदवार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.www.konkantoday.com




