
कांदळवन कक्षामार्फत महिला बचत गटांसाठी मार्गदर्शन करण्यासाठी शिबिराचे आयोजन
कांदळवन कक्षामार्फत राबवण्यात येणार्या पर्यावरणपूरक रोजगाराभिमुख योजनांविषयी माहिती देण्यासाठी नवेदर कोंडसर येथे महिला बचत गटांसाठी त्रिवेणी संघ आणि संकल्प गाव समितीच्या माध्यमातून विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले. शिबिरात विविध प्रकल्पांची माहिती देत शासनाकडून मिळणार्या ९० टक्के सबसिडीविषयी मार्गदर्शन करण्यात आले.
शिबिरात शिंदाने पालन, खेकडे पालन, कालवे निर्मिती, शोभिवंत मासे निर्मिती, मूल्यवर्धित पदार्थ निर्मितीसारख्या प्रकल्पांवर प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराला कांदळवन कक्षाच्या प्रकल्प समन्वयक प्रिया कांबळे, नयन घडशी तसेच जलजीविका प्रकल्पाचे रोहन गुरव व प्रज्योत कांबळे आणि त्रिवेणी लोकसंचलित केंद्राचे व्यवस्थापक राजन लाड यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमासाठी सुषमा पांचाळ, राजश्री पांचाळ, विद्या दाते आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी आणि बचत गटातील सर्व पदाधिकार्यांनी मेहनत घेतली.www.konkantoday.com




