
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आजपासून अंतिम सुनावणी
शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणी आजपासून सर्वोच्च न्यायालयात अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. 2022 मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे गटाला मूळ पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले आहे.त्यानंतर शिवसेना पक्ष आणि निवडणूक धनुष्यबाण चिन्ह कोणाचं? या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर सुनावणी होणार आहे.




