
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदरात उभ्या असलेल्या बोटीचा रोप तुटून नेपाळी खलाशाचा मृत्यू
राजापूर तालुक्यातील साखरीनाटे बंदराच्या जेटीवर उभ्या असलेल्या चार-पाच नेपाळी खलाशांपैकी एका पंचवीस वर्षीय खलाशाचा बंदरात उभ्या असलेल्या मच्छीमारी बोटीचा रोप अचानक तुटून तो तोंडाला व डाव्या बाजूला लागून झालेल्या दुखापतीत दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. शुक्रवारी घडलेल्या या अपघाताची नोंद सागरी पोलीस स्थानकात नाटे येथे रविवारी दाखल करण्यात आली. मयत खलाशाचे नाव रामलखन चौधयी (२५, रा. तालुका जिल्हा कैलाली, नेपाळ) असे आहे.
रामलखन चौधरी हा साखरीनाटे येथील फैरोज हुसेन भाटकर यांच्या बोटीवर ऑगस्ट २०२५ पासून खलाशी म्हणून कामाला होता. शुक्रवारी ७ रोजी दुपारी अडीज वाजण्याच्या सुमारास नेपाळी चार ते पाच खलाशी जेटीवर उभे होते. त्यावेळी बंदरात उभ्या असलेल्या एका बोटीचा रोप अचानक तुटला व रामलखन यांच्या तोंडाला व डाव्या बाजूला वेगाने धडकला. यात त्यांच्या चेहर्याला दुखापत झाली. त्यानंतर फैरोज भाटकर यांनी त्याला खाजगी वाहनाने उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मयत घोषित केल्याचे फिर्यादी फिरोज भाटकर यांनी नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
www.konkantoday.com



