
रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील होणाऱ्या निवडणुकांकरिता भाजप तर्फे जिल्हा संयोजक पदी ऍड. दीपक पटवर्धन व रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक संयोजक पदी श्री. सचिन वहाळकर ह्यांची नियुक्ती !
स्थानिक स्वराज्य संस्था सार्वत्रिक निवडणुक 2025 करिता रत्नागिरी दक्षिण जिल्ह्यातील होणाऱ्या निवडणुकांकरिता भाजप तर्फे जिल्हा संयोजक पदी ऍड. दीपक पटवर्धन व रत्नागिरी नगरपरिषद निवडणूक संयोजक पदी श्री. सचिन वहाळकर ह्यांची नियुक्ती करण्यात आली असून तसे पत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिले आहे या पत्रात चव्हाण यांनी म्हटले आहे की आपण आपल्या संघटन कौशल्याने भारतीय जनता पक्षाच्या जास्तीत जास्त उमेदवारांच्या जागा निवडून आणाल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे




