
खेड-बहिरवली मार्गावरील नांदगाव परिसरात अज्ञात वाहनांच्या धडकेने बिबट्या ठार
रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी लोकवस्तीत बिबटे येत असल्याचे प्रकार घडत असतानाच अनेक ठिकाणी वाहनांचे धडक बसून बिबट्यांचा मृत्यू होण्याचे प्रकारातही वाढ झाली आहे रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात काल सकाळी एक दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे. खेड-बहिरवली मार्गावरील नांदगाव परिसरात रस्त्याच्या कडेला एक बिबट्या मृतावस्थेत आढळून आला आहे.स्थानिक ग्रामस्थांनी हा मृत बिबट्या पाहताच वनविभागाला याची माहिती दिली. वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.प्राथमिक तपासानुसार, अज्ञात वाहनाने धडक दिल्याने या बिबट्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज वनविभागाने व्यक्त केला आहे.
वनाधिकारी उमेश भागवत यांनी सांगितले की, “बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झालेली आहे. या गंभीर जखमेमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला असावा. शवविच्छेदनानंतर नेमकं कारण स्पष्ट होईल.” वनविभागाने मृत बिबट्याचा मृतदेह सुरक्षितरीत्या ताब्यात घेतला असून, आवश्यक तपास व अहवालाची प्रक्रिया सुरू आहे.




