रत्नागिरी शहरातील जयस्तंभ सर्कलचा सुशोभिकरण केलेला कठडा ट्रकचालकाने तोडून ट्रकचालकाचे पलायन


रत्नागिरी शहरात काही वर्षांपूर्वी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या पुढाकाराने जयस्तंभ सर्कलचे नुतनीकरण करण्यात आले होते. या सर्कलला किल्ल्याच्या बुरूजाचा आकार देवून जयस्तंभाचेही नुतनीकरण जे जे आर्टच्या माध्यमातून करण्यात आले होते. त्यामुळे शहरातील मध्यभागात असलेले हे सर्कल सुशोभित झाले होते. मात्र आज सायंकाळी फिनोलेक्सकडून येणार्‍या एका ट्रकने हा सुशोभिकरण केलेला कठडा धडक मारल्याने तोडला मात्र त्यावेळी सर्कलमध्ये काळोख होता. त्यामुळे हा प्रकार उशीरा लक्षात आला.
सध्या काळोख लवकर होतो. मात्र जयस्तंभ सर्कलचे हायमॅक्स उशीरा लागत असल्यामुळे या काळोखाचा फायदा घेवून ट्रकचालकाने या सर्कलच्या कठड्याला धडक देवून पलायन केले. मात्र हा प्रकार ट्रॅफीक पोलिसांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या ट्रकचालकाचा फोटो काढला असल्याचे समजते. आता या सर्वांची नुकसान भरपाई त्या ट्रकचालक अथवा वाहतूक कंपनीकडून घेण्यात यावी अशी नागरिकांची मागणी आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button