
राजापूर तालुक्यातील नाटे येथील कनिष्ठ महाविद्यालयातील तांदूळ चोरी प्रकरणाचा तालुक्यातून निषेध
राजापूर तालुक्यातील नाटे येथील नाटेनगर विद्यामंदिर व कला वाणिज्य (संयुक्त) कनिष्ठ महाविद्यालयातील पोषण आहार तांदूळ चोरी प्रकरणात मुख्याध्यापकांसह सहाय्यक शिक्षकांचा सहभाग असल्याचे उघड झाले आहे. या घटनेचा तालुक्यात निषेध व्यक्त होत आहे. दरम्यान या प्रकरणातील चारही संशयितांना गुरूवारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. त्यानंतर पोलीस तपासाच्या दृष्टीने या संशयित आरोपींना पोलीस कोठडी मिळावी याकरीता नाटे पोलिसांनी शुक्रवारी पुन्हा न्यायालयाकडे मागणी केली असून सायंकाळी उशिरापर्यंत न्यायालयाकडून कोणताही निर्णय देण्यात आला नव्हता, तशी माहिती पोलिसांनी दिली.
बुधवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास नाटेनगर विद्यालयाच्या गोदामातून पोषण आहाराच्या तांदळाची पोती चोरून नेणारी गाडी काही जागरूक नागरिकांनी
अडवून नाटे पोलिसांच्या ताब्यात दिली. या प्रकरणात वाहन चालकं कुणाल अनिल थळेश्री (रा. नाटे, बांदचावाडी) व सुनिल वसंत डुगीलकर (रा. नाटे, बांदकरवाडी) यांच्यासह शाळेचे सहाय्यक शिक्षक नाना बीरा करे आणि मुख्याध्यापक रवींद्र तानू जाधव यांच्याविरोधात नाटे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान त्यांना गुरूवारी अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने या चारही संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली.www.konkantoday.com




