
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेस गाडीची धडक बसल्याने तरुणाचा मृत्यू
रत्नागिरी येथील 30 वर्षीय युवकाचा रेल्वेच्या धडकेत जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. स्वरुप दयानंद कांबळे असं या युवकाचे नाव आहे. स्वरुप हा रत्नागिरीच्या उमरे कांबळेवाडी गावचा रहिवासी होता.
रेल्वेच्या ट्रॅक वरून जाणे, त्या जवळून जाणे हे धोकादायक असते. यावेळी रेल्वेची धडक बसल्यास थेट मृत्यू होऊ शकतो. त्यामुळे रेल्वे ट्रॅकवर किंवा त्या जवळून जाणे हे अत्यंत धोकादायक आहे. 8 नोव्हेंबर रोजी शनिवारी दुपारी दुपारी दोनच्या दरम्यान चांदेराई परिसरात काहींना स्वरूप दिसला होता. त्यानंतर तो रेल्वे ट्रॅकच्या जवळ कसा गेला? हे समजू शकलेले नाही. कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या राजधानी एक्सप्रेस या गाडीची जोरदार धडक या युवकाला बसली आणि यातच त्याचा जागीच मृत्यू झाला.स्वरूप हा युवक रत्नागिरी येथील बोटीवर खलाशी म्हणून काम करत होता. तसेच तो अन्य वेळात प्लंबिंग आणि घरांचे रंगकाम ही कामही तो करत असे. स्वरूप याच्या मृत्यूने कांबळे कुटुंबावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे.




