
रत्नागिरी नगर परिषदेच्या होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज
रत्नागिरी नगर परिषदेच्या होणार्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले आहे. १० नोव्हेंबरपासून दाखल होणार्या उमेदवारी अर्ज प्रक्रियेपासून निवडणूक ते ३ डिसेंबर निकालापर्यंतच्या तयारीला वेग आत्ता आहे. या निवडणु्कीसाठी न. प. हद्दीत एकूण ६९ मतदान केंद्रांची निश्चिती करण्यात आली असून ६४ हजार १४६ मतदार आपला मतदानाचा हवक बजावणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जीवन देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले
या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेच्या माहितीसाठी गुरुवारी नगर परिषदेत देसाई यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी वैभव गारवे हे देखील उपस्तित होते.www.konkantoday.com




