भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करारामुळे काजू उत्पादकांना निर्यात वाढीची नवी संधी


केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी गेल्या आठवड्यात सांगितले की भारत-युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार लवकरच अंतिम टप्यात येईल. या करारामुळे भारतीय काजू उत्पादकांना युरोपातील बाजारपेठेत मोठी व्यावसायिक संधी -मिळेल, अशी आशा काजू उद्योजक बाळगून आहेत.
मंत्री गोयल यांनी ब्रसेल्स दौर्‍यादरम्यान करारातील प्रगतीची माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही बाजूंनी कराराच्या २० पैकी १० महत्त्वाच्या प्रकरणांवर सहमती दर्शविली आहे. उर्वरित प्रकरणांवर वेगाने काम सुरू आहे. भारत आणि ’इयुं’ने २०२५ च्या हा पूर्ण उद्दिष्ट अखेरीस करार करण्याचे ठेवले आहे. व्हिएतनाम आणि आयव्हरी कोस्टचे भारतीय काजू निर्यातीसाठी मोठे आव्हान आहे. सध्या भारतीय काजू उत्पादकांना इयुमध्ये निर्यात करताना मोठी स्पर्धा आणि शुल्क अडथळे येतात.
भारतीय प्रक्रिया केलेल्या काजूवर इयुमध्ये ५.६ ते ८ टक्क्यांपर्यंत आयात शुल्क लागते. यामुळे, किमतीच्या उत्पादने बाबतीत भारतीय महाग आहेत मात्र आता भारत-इयु करारामुळे भारतीय बाजूला युरोपमध्ये शुल्क-मुक्त प्रवेश मिळेल. यामुळे किमतीतील ५ ते ८ टक्क्यांचा फरक संपुष्टात येऊन भारतीय उत्पादने थेट व्हिएतनाम व आयव्हरी कोस्टच्या काजू किमतीशी स्पर्धा करू शकतील. भारतीय काजूची किंमत ग्राहकांसाठी कमी होणार आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button