
खेड बस स्थानकात मुंबईतील महिलेच्या पर्समधील सव्वा लाखांचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविले
मुंबईतून आपल्या मुलाला भेटण्यासाठी आलेल्या फिर्यादी प्रभावती मोरे या महिलेच्या पर्समधील अंदाजे सव्वा लाख रुपये किंमतीचे दागिने अज्ञात चोरट्याने लांबविले. फिर्यादी या आपल्या मुलाला भेटायला चिपळूण येथे जाण्यासाठी खेड बसस्थानकात एसटीमध्ये चढत असताना गर्दीचा फायदा घेवून अज्ञात चोरट्याने फिर्यादीच्या गळ्यात अडकवलेल्या पर्समधून सोन्याची बोरमाळ व रोख रक्कम असा सव्वा लाख रुपये किंमतीचा ऐवज लांबविला.www.konkantoday.com




